चंद्रपुर(निर्भीड न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०५.१९
चिमूर,उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्य ग्राम पंचायत पळसगावला ३४०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी ग्राम पंचायतने आतापासूनच कंबर कसली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीनपट अधिक वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवण्यात आले. आहे त्यासाठी ग्राम पंचातच्या वतीने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत श्रमदानातुन खड्डे खोदकाम कामाचा शुभारंभ आज दिनांक २५ में २०१९ ला घेण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ पळसगाव चे सरपंच सौ. गीता शेंडे यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायतीचे सचिव सी. जी. वाघ यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात रमाई घरकुल धारक लाभार्थी,प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी, ग्राम पंचायत कर्मचारी भक्तदास कोयचाडे, संगणक परिचालक विकास खोब्रागडे,रोजगार सेवक,वासुदेव कोहळे,ग्राम पंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होते.



















