बीड (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०९.२०२१
आष्टी- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कारभार चालवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले संगणक ऑपरेटर व त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी, अन्याया विरुद्ध आवाज उठविण्यासाठी तालुक्यात कार्यरत असलेल्या परिचालक संगणक ऑपरेटर संघटनेची नुकतीच आष्टी येथे ९ सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते नवीन आष्टी तालुका संगणक परिचालक संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर करण्याच्या निर्णय घेण्यात आला. यामध्ये परिचालक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी किरण खिलारे तर उपध्यक्षपदी कृष्णा डोरले यांची निवड करण्यात आली. सचिवपदी राहुल डोळे, कार्यअध्यक्षपदी दिपक वामन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यांच्यासह सदस्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या झालेल्या निवडीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले असून त्यांच्यावर तालुक्यातील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी, ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहू असा विश्वास यावेळी खिलारे यांनी व्यक्त केला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष भाऊराव धोंडे, हानुमंत भिसे, तेजस गिर्हे, सागर औटे, बाळु थोरवे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न होत, कार्याध्यक्ष दीपक वामन यांनी सर्वांचे आभार मानले.



















