सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०४.२०२०
पाटण- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यातच लॉकडाऊनमुळे मटण मासे यांचा तुटवडा असल्याने काही शिकाऱ्यांनी हौस भागवण्याच्या उद्देशाने मोजे बेलदरे ता. कराड येथील काही महाभागांनी चक्क रानडुक्कराची शिकार करत भाजून त्याची काटछाट करत असल्याचे गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाला कळताच घटनास्थळी जावून वनविभागाने चार आरोपींना अटक केली. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अत्यंत कमी कर्मचारी उपस्थितीत असताना वन गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे जिकिरीचे असतानाही वनसंपतीचे रक्षण जीवावर उदार होऊन वन कर्मचारी करताना दिसून येत आहेत.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २३एप्रिल२०२० रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे वनरक्षक म्होप्रे श्री. गलप, वनरक्षक विजयनगर चौक नाका येथील श्री.खटावकर व रोंजहारी मजुर हे त्वरित मौजे बेलदरे ता.कराड येथील नाईकबा देवस्थानाजवळील शेतामध्ये रानडुक्करास पार्थ्यांकडे असलेली चरबी लावून ठेवलेल्या बॉम्बच्या सहाय्याने मारून, रानडुक्करास भाजून त्याची काटछाट करत असताना प्रत्यक्ष जागेवर चार आरोपींना पाहिले. त्यातील दोन आरोपी फरार झाले होते. त्यानंतर गावात शोधाशोध केल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने फरार झालेल्या दोनी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी नामदेव महादेव चव्हाण, गोरख आप्पासो जाधव, सुधीर सुनील खांबे, अविनाश जालिंदर जाधव सर्व राहणार मौजे बेलदरे ता.कराड यांना वनविभागाने ताब्यात घेवून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४,४८ A व ५१ अन्वये वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या
कारवाईत मा.सहा.वनसंरक्षक, सातारा किरण कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल रमेश कुंभार, वनरक्षक गलप, खटावकर, कदम, जाधवर यांनी करवाई केली. सदर घटनास्थळी पंचनामा व चौकशी जबाब घेण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे वनविभागाकडून जप्त करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.



















