निर्भिड पत्रकार, पाटण प्रतिनिधी : विकास कदम
त्रिपुडी येथे झालेल्या फिरते पोलीस स्टेशनच्या बैठकीत सन्माननीय पोलीस निरीक्षक मांजरेसाहेब यांनी त्रिपुडी ग्रामस्थांना कायदा व सुव्यवस्था या बाबत मार्गदर्शन करून तमाम त्रिपुडी वासीयांची मने जिंकली. त्रिपुडी या गावी फिरते पोलीस पथकाची पहिलीच मिटींग आयोजीत करण्यात आली.पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे स्वागत पोलीस पाटील शशिकला देसाई मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तर पोलीस कर्मचारी गोतपागर यांचे स्वागत उपसरपंच धनाजी देसाई यांच्या हस्ते तर पोलीस कर्मचारी गुरव यांचे स्वागत मनोहर पाटील,पोलीस पाटील सौ.शशिकला देसाई मॅडम यांचे स्वागत बाळासाहेब पाटील,उपसरपंच यांचे स्वागत माजी सरपंच विलास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.प्रस्ताविक शशिकांत देसाई यांनी तर आभार विक्रम देसाई यांनी मानले. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्रिपुडी या गावी मोलाचे मार्गदर्शन केले.उपस्तीत असणाऱ्या तरुण वर्गाला व ग्रामस्थांना कायदा व सुव्यवस्था यावर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करत असताना सर्वांची नजर व कान मांजरे सरांच्या बोलण्याकडे होते.यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा दल हे काम करेल व सुरक्षा दलाची माहिती व त्यांची कामे काय असतात व त्यांना कोणते अधिकार असतात हे मांजरे सरांनी ग्रामस्थ व तरुण वर्गाला सांगितले.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्रिपुडी गावातील तरुण वर्गाचे व ग्रामस्थांचे समाज मन जिंकून त्यांना जाग्रुत केले. तरुण वर्गातून व ग्रामस्थांनकडुन मांजरे सरांचे कौतुक करण्यात आले.विक्रम देसाई यांनी तरुण वर्ग तुमच्या सोबत असेल असे अण्णासाहेब मांजरे यांना सांगितले. आणि आमच्या गावचे युवा तरुण वर्ग तुम्हाला सुरक्षा दल असेल अथवा इलेक्शन पिरेड मधे तुम्हाला सहकार्य करेल व करत असतो असे विक्रम देसाई यांनी सांगितले. उपस्तीत असणारे गावचे उपसरपंच धनाजी देसाई,माजी सरपंच आबा देसाई,विलास गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य बॉडी,माजी सदस्य दादासो पाटील, लक्ष्मण देसाई,त्रिपुडी गावचे ग्रामस्थ उपस्तीत होते.



















