सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०६.२०२०
सांगली- जिल्हा परिषदचे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांच्या दक्षतेमुळे जखमी झालेल्या कोल्ह्याला जीवनदान मिळाले या बाबतची अधिक माहिती अशी आहे की, डॉ किरण पराग आपले महाराष्ट्र शासनाचे एम एच १० एन१७ या वाहनातून तासगाव शिरडोन रस्त्यावरून प्रवास करत असतांना त्यांना बोरगाव हद्दीत रस्त्याच्याकडेला वाहनाच्या धडकेतून गंभीर जखमी झालेला कोल्हा दिसला. प्रथमदर्शनी डॉ किरण यांना कोल्हा मयत झाला असावा असं वाटले त्या नंतर जवळ जाऊन पाहायले असता तो कोल्हा जिवंत होता परंतु गंभीर जखमी अवस्थेत होता. तिथे असणारे सर्व लोक हा क्षण बघत उभी होती पण कोणीच पुढे येत नव्हते. तेव्हा डॉ पराग यांनी क्षणाचाही विलंब नकरता, त्यांच्या वाहन चालक असणारे श्री मुजीब सलोटगी यांना सूचना देऊन जखमी झालेल्या कोल्ह्याला ताब्यात घेऊन आपल्या वाहनातून उपचारासाठी शिरडोन येथे असलेल्या पशु चिकित्सालय या ठिकाणी घेऊन जाऊन तिथे उपस्थित असणारे डॉ धनाजी पाटील व परिचारक श्री पाटील यांच्या सोबत जखमी झालेल्या कोल्ह्यावर उपचार केले. त्या नंतर कवठेमहंकाळ येथील वन विभागातील अधिकारी यांना कळवून जखमी असलेला कोल्हा उपचार करुन त्यांच्या ताब्यात दिला. तो जखमी झालेला कोल्हा पूर्ण पणे बरं झाल्यानंतर जंगलात सोडुन देण्यात येईल असं वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.



















