सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी.
दि.२५.०७.२०२०
सांगली – येथील इंदिरा नगरमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. शुक्रवारी २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर महानगर पालिकेकडून सील करण्यात आला होता.मात्र रॅपिड अँटिजेन टेस्टला या परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. संतप्त नागरिकांनी शनिवारी कंटेन्मेंट झोनमध्ये राडा केला.
पोलिसांसमोरच परिसरातील कंटेन्मेंट झोनची तोडमोड करण्यात आली. बॅरिगेट्स तोडून टाकले, पत्रे उचकटून मोठ्या प्रमाणात झोनची तोडमोड केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय तपासणीला इंदिरा नगर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं होत असल्यानं महानगरपालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्य रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये इंदिरा नगरमध्ये सापडले २३ पॉझिटिव्ह सापडले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण इंदिरा नगर हे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार या परिसरात तातडीने औषध फवारनीसह वैद्यकीय सर्व्हे वाढण्यात आला आहे. याचबरोबर उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त एस एस खरात, स्वच्छता निरीक्षक बंडा जोशी, याकूब मद्रासी , अतुल आठवले यांच्या टीमकडून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांच्या वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेणेचे काम सुरू असून कंटेन्मेंटच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे.



















