सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७.६.२०२०.
फलटण- दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यानी साखरवाडी मध्ये एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत मदतीचे आवाहन केले होते याला प्रतिसाद म्हणून अरुण आटोमोबाईल चे सर्वेसर्वा शंकर धोत्रे व खामगावचे युवा उद्योजक महेश संजय कुचेकर, निर्भीड पत्रकार जिल्हा प्रतिनिधी सुभाष जाधव, निर्भिड पत्रकार फलटण तालुका प्रतिनिधी शिवाजीराव भोसले, निर्भिड पत्रकार फलटण तालुका प्रतिनिधी धीरज जगताप यांनी मोलाचे योगदान दिले त्याच बरोबर प्रगतशील शेतकरी प्रतीक भैय्या नलवडे, सौरभ भैय्या पवार, विनोद कुचेकर, वैभव बळीप बंधू, यांचे सहकार्य लाभले सामाजिक बांधिलकी जपत कंटेनमेंट झोनमधील वरील सर्व सर्वानी मोलाचे सहकार्य केले
या उपक्रमांतर्गत आरिफ भाई मणेर सुभाष जाधव, दादा जाधव, रोहन चव्हाण, अक्षय वाडेकर, अनवर भाई महात, गोरख गोरे, विजय भगत यांनी मदतीचे आवाहन केले होते याला उत्सव प्रतिसाद मिळाला
हे सर्व साहित्य कंटेनमेंट झोनमधील स्वयंसेवक संग्राम औचरे, रवी तोरणे, दयानंद मागाडे, विनोद सरतापे विनोद सरतापे, अमोल मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले या स्वयंसेवकांनी गरजू कुटुंबांच्या घरोघरी जाऊन वाटप केले याबद्दल या उपक्रमात सर्वानी आपल्या परीने मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.



















