सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२४-११-२०२०
फलटण- साखरवाडी येथील रविवारी होणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय साखरवाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे. सध्या साखरवाडी परिसरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रविवारीचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. तसेच इथून पुढे सुद्धा आठवडा बाजार रद्द व्हावा. अशी मागणी साखरवाडी ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या साखरवाडी मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. साखरवाडी आठवडी बाजार मध्ये फडतरवाडी, मुरूम. होळ. जिंती. खामगाव. सुरवडी. निंभोरे. खराडेवाडी . तडवळे, काळज. इत्यादी. ठिकाणावरून नागरिक आठवडा बाजारासाठी येत असतात. साखरवाडी ही बाजारपेठ तालुक्यामध्ये मोठी असल्याने तालुक्यातून शेतकरी पालेभाज्या विक्रीसाठी या ठिकाणी येत असतात. सध्या साखरवाडी मध्ये साखर कारखाना सुरु असल्याने बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तसेच साखरवाडी मध्ये सोशल डिस्टन्सचा व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचा उल्लंघन कायमच होत. आहे, या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रविवारीचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. तसेच यापुढेही बंद ठेवण्यात यावा. तसेच नागरिकांनी पालेभाज्या व इतर खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. अशी मागणी साखरवाडी ग्रामस्थांकडून होत आहे.



















