चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०१.२०२०
🔹शेगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त
चिमूर- तालुक्यातील खडसंगी जवळील खानगाव येथील सर्व नागरिकांनी सीएए, एनआरसी, व एनपीआर विरोधात आज चिमूर वरोरा हा राष्ट्रीय महामार्ग काही काळ अडवून धरला. यामुळं प्रवाश्याना मोठा नाहक त्रास सहन करावा लागला होता.
देशातील केंद्र सरकार वाढती महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थ व्यवस्था, या ज्वलंत समस्या कडे दुर्लक्ष करुन जनतेची दिशाभूल करत आहे. अशातच सीएए व एनआरसी, एनपीआर लागु करुन सामान्य जनतेच्या आकांक्षेवर पाणी फिरवत आहे याचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सीएए, एनआरसी, एनपीआर याच्या विरोधात खानगावातील नागरिकांनी चिमूर वरोरा या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून काही काळ रस्ता अडवून धरला होता. यामुळं दूर जायच्या प्रवाशाना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला होता. सीएए, एनआरसी, एनपीआर च्या विरोधात आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली. त्यामूळ शासना विरोधात नागरिक एकवटले असून, सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात नारे देण्यात आले. नागरिकांना आज रस्त्यावर येणे भाग पडले. सीएए, एनआरसी, एनपीआर याविरोधात रस्त्यावर आले असून, हे आंदोलन शांततेत पार पडले.
या आंदोलनाला वेगळे वळण येऊ नये म्हणून सकाळ पासूनच शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात शेगाव येथील पोलीस पथक सर्व आंदोलन कर्त्यांवर बारीक नजर ठेवून होते.
आंदोलना दरम्यान प्रदीप रामटेके, गजानन राजूरकर, सुनिल रामटेके, लहू खोब्रागडे, वैभव रामटेके, सुनिल पाटील, घनश्याम रामटेके, संजय बोढे, व भिक्षु संघ संघारामगिरी चे पदाधिकारी उपस्थित होते.