सोलापूर(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०१.२०२१
माळशिरस- सुळेवाडी येथिल जनकल्याण महिला बचत गट रेशन दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असून गावातील लोकांची फसवणूक केली जात आहे. जानेवारी महिना संपत आला तरीसुद्धा अजुन डिसेंबरचे रेशन वाटप अध्यापही लोकांना झालेले नाही. डिसेंबर महिन्याचे रेशनींग माल सुळेवाडी येथील रेशन दुकानांमध्ये न उतरवता तोमाल पिलीव विकास सोसायटी मध्ये कोणाचीही परवानगी न घेता किंवा कोणालाही माहिती न देता त्या रेशनींग मालाची बाहेरच्या बाहेर विल्हेवाट लावायची या उद्देशाने तो माल तेथे ठेवण्यात आला होता. सुळेवाडी येथील काही ग्रामस्थांनी याची चौकशी केली असता या मालाचा उलगडा करण्यात आला. ग्रामस्थांनी अधिक चौकशी केली असता रेशन दुकानदार मालकाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

यानंतर सुळेवाडी येथील ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात तक्रार अन्नपुरवठा अधिकारी सोलापूर यांच्याकडे केलेली असून गावातील ग्रामस्थ तालुक्याचे लोकप्रतिनिधी, तहसीलदार,तसेच अन्नपुरवठा अधिकारी यांच्याकडे न्यायची अपेक्षा धरून बसलेले आहेत.यापूर्वी सुद्धा लॉकडाऊनमध्ये अशाप्रकारे रेशनिंग मालाची अफरातफर झालेली आहे. तरी या वेळेस रेशन दुकानदार यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी सुळेवाडी येथील ग्रामस्थ करत आहेत.



















