सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०१०.१९
कवठेमहाकाळ- स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ खराडे व वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव यांना दोन वर्षासाठी सांगली सातारा कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे याचा निषेध म्हणून कवठेमंकाळ तहसीलदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, आर पी आय, च्या वतीने निवेदन देण्यात आले.महेश खराडे व भागवत जाधव यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी व लाभासाठी काम केलेले नाही, महेश खराडे व भागवत जाधव हे चोर, डाकू, लुटारू, दरोडेखोर, नाहीत त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय व हक्क त्यांना मिळण्यासाठी वारंवार रस्त्यावर उतरून अनेक आंदोलन त्यांनी केलेली असताना हे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर केलेली हद्दपारीची कारवाई रद्द करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष सुरज पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष हनमंत कांबळे बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, तालुका कार्याध्यक्ष अमर शिंदे, तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुनील हुबाले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने उपस्थित होते.



















