सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०६.२०२०
फलटण- शहर पोलीसांनी कुरेशी नगर येथे रात्री धाड टाकून जनावरांचे सुमारे १२०० किलो मांस, जनावरे व माल वाहतूक गाड्या असा सुमारे १५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.
याबाबत शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की आरोपी- आसिफ पीर मोहम्मद शेख कृष्णा नगर हडपसर पुणे, सुफियान रफिक बागवान लूया नगर गंज पेठ पुणे, इरफान चांद कुरेशी रा. कुरेशी नगर फलटण व एक अज्ञात इसम हे रात्री २.३० वाजताच्या सुमारास इसम नामे इरफान चांद कुरेशी रा. कुरेशी नगर फलटण यांनी बोलेरो पिकअप क्रमांक एम एच १४ ए एस ३६८६ व टाटा ४०७ गाडी क्रमांक एम एच १२ सि टी ९८०४ मधून आसिफ पीर महंमद शेख, सुफियान रफिक बागवान यांचे मार्फत सुमारे १२०० किलो जनावरांचे मांस व बोलेरो पिकप गाडी क्रमांक एम एच ११ बी एल १६२९ मधून दोन जिवंत जर्शी जनावरे याची अज्ञात चालक यांचेमार्फत वाहतूक करीत असताना सुमारे १५ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आला आहे.
मिळालेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे
◆ ४,००,००० बोलेरो पिकअप
◆ १०,००० दोन जरशी गाय
◆ ६,००,००० टेम्पो
◆ ८०,००० जनावरांचे ८०० किलो मांस
◆ ४,००,००० बोलेरो पिकअप
◆ ४०,००० जनावरांचे ४००किलो मांस
◆ ५००० एक मोबाईल असिफ बागवान याचा
◆ ५००० एक मोबाईल सुफीयान बागवान याचा
गुन्हा रजिस्टर नंबर व कलम – २०९/२०२० भादवि १८८ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ९ (a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची फिर्यादी भास्कर रामा पिचड पोलीस कॉन्स्टेबल फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे. कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सचिन राऊळ स.पो.नि. पो.हवा. चन्ने, पोलीस नाईक जाधव, पो.शि. पिचड, पो.शि. कुंभार, यांनी कारवाई केली असून पुढील तपास स.पो.नि. राऊळ करीत आहे.



















