मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८/१/१९
🌑 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव…
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना एक विचारमंच उपलब्ध व्हावं व विविध क्षेत्रातील युवकांना त्या संधीच सोनं करता यावं म्हणून आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन मुंबई तर्फे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण गावस्कर सभागृह मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर येथे नुकतेच
पार पडले.यावेेळी प्रश्न मंजूषा, महिला, LGBT आणि इतर अर्थाने सक्षम समाजासोबत सेल्फी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, डॉ. बि.आर.आंबेडकर लिखित “जातिव्यवस्थेचे निर्मूलन” या पुस्तकावर आधारित परिक्षा, स्वरचित काव्य वाचन स्पर्धा, पोवाडा/क्रांतीगीत गायन स्पर्धा, नारायण मेघाजी लोखंडे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अशा विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच रोहित वेमुला याच्या स्मृती दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रश्न मंजुषा स्पर्धेत अस्मिता कटारे हिने प्रथम तर जोहा खान हिने द्वितीय क्रमांक व तेजल सावरकर हिने तृतीय व सुवर्णा जाधव हिने उनतेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. समजासोबत सेल्फी या मंध्ये आनंदराज घाडगे याने प्रथम, एकनाथ गोपाळ याने द्वितीय तर आकेश मोरे याने तृतीय व विजीता राजन हिने उतेजनार्थ बक्षिस मिळवलं आहे. वक्तृत्व स्पर्धेत सुप्रिम मस्कर प्रथम तर आकाश पाटील याने द्वितीय तर
लक्ष्मण कचरे याने तृतीय तर प्रची भगत,मृणाल सापळे,प्रथमेश्वर उंबरे,तेजस पारपोलकर,अक्षय इळके यांनी उत्तेजणार्थ क्रमांक मिळवला आहे. निबंध स्पर्धेत मयुर दंडाळे याने प्रथम, शैलेश कोंडसकर याने द्वितीय, सतिश कांबळे याने तृतीय, मोतीलाल पावरा याने उतेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. “जातीभेदाचे निर्मूलन” स्पर्धेत प्रथम निखिल अडसुळे, उम्मे हानी खान द्वितीय, स्वप्नील सकपाळ याने तृतीय व अलिशा कांबळे हिने उनतेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. कविता वाचन स्पर्धेत उद्देश पवार याने प्रथम, शेखर चोरघे याने द्वितीय, सुजित काळंगे याने तृतीय, भाऊसाहेब सोनावणे, प्रवीण खरे, पल्लवी सुर्यवंशी, निखिल बेलोटे, प्रतीक्षा काटे, अक्षता परकांडे, शफक खान, पद्मजा वडाळकर, तुषार मांडवकर, जयेश शिंदे यांनी उतेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. पोवाडा स्पर्धेत विनोद गोडबोले प्रथम ,सुबोध सुर्वे दृतीय,श्रुती खैरे तृतीय, प्रमोद येलवे याने उतेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. शुभम पेडामकर, कुणाल रामटेके, मिलिंद जाधव यांना नारायण मेघाजी लोखंडे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून सोबतच शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कार्यात आर्थिकदृष्ट्या हातभार लागावा म्हणून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला राजकुमार मोरे, मुख्याध्यापिका कविता भोसले, दिलीप रणदिवे प्रमुख म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमातून विविध स्पर्धांच्या मांध्यमातून तुम्ही उर्जा घेऊन जात आहेत.आणि हजरो रोहित वेमुला रस्त्यावर लढण्यासाठी उतरले आहेत.लिहायला, बोलायला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार मांडण्यासाठी आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन मुंबई तुम्हाला विचारमंच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे असे उपस्थितांनी बोलतांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संघटनेचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांनी मांडले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवराज कांबळे, सचिव बुद्धभूषण कांबळे, सुदर्शन कुलाबकर, अक्षय कांबळे, संदीप कांबळे, नितीन कांबळे, एकनाथ गोपाळ,आनंदराज घाडगे, सुयश कांबळे, विशाल वाघमारे, तर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच “महाड क्रांतिभूमी भेट” व “शॉर्टफिल्म स्पर्धा” “चित्रकला स्पर्धा” यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश कांबळे याने केले.



















