नागरी समस्यांसाठी महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क प्रतिनिधी,
दि.१२.०९.२०२६
तेल्हारा – मिलिंद नगर परिसरातील विविध नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करावे, या मागणीसाठी परिसरातील महिलांनी तेल्हारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुक्रवारी (ता. ११) निवेदन दिले.
मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला वॉल कंपाउंडची भिंत बांधण्यात यावी, तसेच मिलिंद नगर परिसरातील सर्व्हिस गल्लीमधील नाल्यांची तातडीने साफसफाई करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या वेळी रेखा वानखडे, रागिनी तायडे, रेखा दारोकर, सीमा कराईत, रीना हिवराळे, पूजा बोडके, अलका खंडारे, रंजना इंगळे, निकिता सपकाळ, दुर्गा वानखडे, मानवी वानखडे, तिळाबाई वानखडे, राजकन्या पचौरे, अर्चना पोहेकर, गोकुळाबाई भारसाकडे, सुनंदा तायडे, शांताबाई तायडे, गोदावरी सपकाळ, सुरेखाबाई टाटे, ललिताबाई तायडे, संगीता हिवराळे, रेखा भोजने, रंजना वानखडे, कल्पना भोजने, जयश्री अवचार, सुरेखाबाई भोजने, शशिकलाताई तेलगोटे, अनिता सावंत, कविता गन्हाडे, मीरा बोडके, शुभांगी सावंग, शुभांगी भारसाकडे, प्रेमिलाबाई तायडे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



















