पिंपरी चिंचवड: दि.२५.०४.२०१८ येथील जाधववाडी येथे तक्षशिला फाऊंडेशनच्या वतीने तीन दिवसीय भव्य अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये २१तारखेला पहिल्या दिवशी नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवक, युवती व बालकांनी आपली कला सादर केली विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.दुसऱ्या दिवशी प्रतापसिंग बोदडे, जळगाव यांचा प्रबोधनात्मक भिम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बोदडे हे जेष्ठ प्रबोधनकार शाहीर वामनदादा कर्डक यांचे शिष्य आहेत.याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.यावेळी तक्षशिला फाऊंडेशन चे अध्यक्ष अनिल भारती यांना बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष किरण शिंदे व नगरसेवक राहुलदादा जाधव यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले.यावेळी राहुल जाधव,किरण शिंदे संगीता उदागे,संगीता भोसले यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.याच दिवशी स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला.तिसऱ्या दिवशी म्हणजे २३ तारखेला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमास स्थानिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.यावेळी समाजसेवक किरण शिंदे, नगरसेवक राहुलदादा जाधव,नगरसेवक अश्विनी जाधव,संतोष जाधव,संदिप जोगदंड,सुमित गायकवाड,विकास ओव्हाळ,अजय शिंदे,संदिप सरोदे,त्रिशरण गायकवाड यांचेसह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल भारती,संगीता उदागे,संगीता भोसले,अनुसया भारती,छकुल्या जाधव,दीपक शिखरे,राजेंद्र वाघमारे,श्रावण उदागे,योगेश इंगळे,महेश लगाडे,प्रशांत कांबळे,आकाश डोंगरे,निलेश उबाळे यांनी परिश्रम घेतले.



















