कवठेमंहकाळ तालुक्यातील आगळगाव येथे मामा भाचे फाऊंडेशनच्या वतीने १ मे २०१८ रोजी बद्ध जयंतीनिमित्त शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक वस्तुंचे वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सांगितले आहे.आपणा सर्वाना ज्ञात आहे की, आजचे युग शैक्षणिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. आपण भाग्यवान आहोत की आपणांस चांगले शिक्षण,चांगली नोकरी,सुरक्षित निवारा मिळाला आहे. हे केवळ उत्तम शिक्षणामुळे व योग्य मार्गदर्शनामुळे शक्य झाले. परंतु समाजातील हजारोंच्या मुलांचे शिक्षण व सामाजिक दर्जाचे काय? त्यांना आपल्या ज्ञानाची, विचाराची व योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेत आहेत. या कार्यक्रमासाठी प्राचार्य दशरथ वाघमारे सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.



















