महाबळेश्वर : दि.२५.०४.२०१८ येथील गोगवे येथे नवतरुन बौध्द विकास मंडळाच्या वतीने भव्य अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दि.२५ रोजी सकाळ पासुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवक, युवती व बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला. महीलांसाठी महीला शिबीराचे आयोजन केले होते. दुपारी ४ वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पंचशील बुध्द विहार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी काढण्यात आली होती. यावेळी शिवाजी महाराजांचे पुतळ्यास गावचे पोलीस पाटील उत्तम शिवराम कदम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सायंकाळी सभेचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुमीत कांबळे,सागर मोरे,आकाश कांबळे, अजिंक्य कांबळे, अनिकेत मोरे, सागर कांबळे, राहुल मोरे हे उपस्थित होते.युवा नेतृत्व अभिजीत कदम यांनी सुत्र संचालन केले. शिवराज विजय कदम,सिद्धांत संतोष कदम,ऋतुजा सकपाळ,सानिका संतोष कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नवनाथ भोसले यांचा ‘तथागत ‘हा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम झाला.यावेळी सर्व वातावरण भीममय झाले होते.



















