महाबळेश्वर : दि.३०.०४.१८ विकर सेक्शन,नगरपालिका चाळ अशा अनेक नावाने आजतागायत ओळखली जाणारी निनावी वस्ती गेली अनेक वर्षे नावाची वाट पाहत होती.अखेर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार व प्रयत्नाने बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या माध्यमातून त्या महाबळेश्वर येथील निनावी मागासवर्गीय वस्तीला “तथागत नगर” हे नाव मिळाले आहे.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांचे हस्ते व महिला प्रदेशाध्यक्षा माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत तथागत गौतम बुद्धांच्या ३५६२व्या जयंतीचे औचित्य साधून या वस्तीस तथागत नगर हे नाव देण्यात आले आहे.तथागत नगर या नामफलकाचे उद्घाटन किरण शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या माध्यमातून आपण अनेक वस्तीना महापुरुषांची नावे देण्याचा उपक्रम राबवित असून त्यामुळे अशा निनावी,दुर्लक्षित वस्तीना एक नवीन ओळख मिळत असल्याची माहिती किरण शिंदे यांनी दिली.यापूर्वी देखील असे अनेक कार्यक्रम आपण घेतल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी तथागत नगर येथील नागरिकांना किरण शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या व आपला आदर्श घेऊन शहरातील अनेक वस्तीचे स्थानिकांचे मान्यतेने नामकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या अभिनव उपक्रमाच्या पुर्तते साठी तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,पंकज कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.या कार्यक्रमास किरण शिंदे, बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या,प्रदेशाध्यक्षा छायाताई शिंदे,शुभांगी शिंदे,कविता मोरे,अनिता मोरे,सुनंदा रोकडे,काजल गायकवा
ड,शीतल कांबळे,रंजना कांबळे,सुरेखा कांबळे,श्वेता मोरे,वंदना मोरे,स्वप्ना मोरे,श्रीदेवी वाघमारे,अंजना कसबे,प्रकाश जाधव,शाहीन पन्हाळकर,आलिया,नंदा मोरे,संगीता कांबळे,मधुमालती खरे,सुजाता मोरे,शांताबाई जाधव,किरण शिंदे,तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,पंकज कांबळे,अनिकेत मोरे,गोरखनाथ शिंदे,अजय कांबळे,राहुल मोरे,आकाश कांबळे,अमोल काकडे,नयन वने,सनी चव्हाण,कैलास रोकडे,अजिंक्य कांबळे,महेंद्र रोकडे,संपत मोरे,भिकन मोरे,दशरथ कांबळे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



















