निर्भिड पत्रकार,चंद्रपुर,प्रतिनिधी, प्रतिक नळे
दिंनाक-२२/५/२०१८
तालुका, बल्लारपुर तालुक्यातील बामणी येथील एका भंगार दुकानाला आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. दुकान बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली. दुकानातून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने व दुकानात ठेवलेल्या गैस सिलेंडर स्पोटाच्या आवजाने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.ही घटना त्वरित आग्निशामक व पोलिसांना कळविल्याने अग्निशामक दल व पोलिस प्रशासनाच्या मदतीने दोन तासात अटोक्यात आणली. हे दुकान सलीम शेख यांच्या मालकीचे असुन या आगीत अंदाजे पंधरा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. या प्रसंगी गावचे सरपंच सुभाष ताजने,उपसरपंच जमिल शेख पोलिस पाटिल गिरजाबाई किनाके तंटा मुक्तीचे अध्यक्ष मनोज माणुसमरे व गावकरी यांनी उपस्थित राहून मदत केली.



















