भोन ते नविन वसाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
रस्त्याच्या कडा भरण्यासाठी चक्क पिवळ्या मातीचा वापर
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२०.०७.२०२६
संग्रामपुर- तालुक्यातील नवीन भोन ते नवीन वसाडी रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे सुरू आहे रस्त्याच्या कडा साईड शोल्डर भरण्यासाठी चक्क पिवळ्या मातीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात रस्त्याने येजा करणाऱ्या वाहनधारकांना या रस्त्यावर टाकलेल्या पिवळया मातीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत. तसेच या रस्त्यावर पिवळी माती वापरण्यात येत असल्यामुळे हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनत आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ या विभागा अंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र संबंधित कंत्राटदाराकडून या रस्त्यावर सदर कामाचे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाही आहे. कवठळ ते काकोडा तसेच काकोडा बोडखा या रस्त्यावर दोन्ही बाजुला पिवळी माती टाकण्यात येत आहे. तसेच रस्ता खोदकाम करताना मातीचे रस्त्यावर मातीचे ढिगारे या रस्त्यावर टाकण्यात येत आहे . त्यामुळे दररोज रस्त्यावर अपघात होत आहेत. तसेच रस्त्याचे साईड शोल्डर तयार करताना अत्यंत कमी प्रमाणात खोदून त्याच्यावर कुठलेही ओव्हर साईज किंवा मुरूम न वापरता पूर्णपणे पिवळ्या मातीचा वापर करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील व संग्रामपूर तालुक्यातील नव्याने मंजूर झालेला नवीन भोन ते नवीन वसाडी रस्ता जवळ जवळ ३५ किलोमीटर अंतराचा आहे. परंतु या रस्त्याचे कामाची गुणवत्ता चांगली नसून सदर रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.
काही ठिकाणी तर पिवळी माती दाबण्यासाठी फक्त वरचा थर हा मुरुमाचा वापरण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्ता बांधकामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.



















