तेल्हारा येथे विद्यार्थ्यांची भव्य रॅली; तहसीलदारांना निवेदन…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२०.०७.२०१६
तेल्हारा – देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी म्हणजे आज भव्य विद्यार्थी रॅली काढली. विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“ना जात, ना धर्म, ना कोणतीही राजकीय भिंत… आमचा एकच धर्म, विद्यार्थी आणि शिक्षण” या घोषणांसह विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. रॅलीनंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनाचे नेतृत्व योगेश सरदार, पवन बोदड, निलेश वानखडे, सुरज भोजने, आकाश भोजने, सुयश बोदडे, स्वरित बोदडे, आदित्य बोदडे, प्रणव विरघर, योगेश वानखडे सर आणि सचिन गावडे सर यांनी केले. या सर्वांनी विद्यार्थ्यांना एकत्रित ठेवत आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून, शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. “शिक्षण वाचवा – भविष्य घडवा” हा संदेश देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.



















