निर्भिड पत्रकार,
कराड . तालुका प्रतिनिधी. सूरज जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वातिने आज स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे व स्वाभिमानीचे कामगार नेते अनिल घराळ बापू यांच्या नेतृत्वाखाली कराड मध्ये इंधन दरवाढ व साखर उद्यागाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकार विरोधात गाड़ी ढकला मोर्च्या काढ़न्यात आला.हा मोर्च्या विजय दिवस चौक, दत्त चौक मार्गे प्रांताधिकारी कार्यालय असा निघाला यावेळी दुचाकी व चारचाकी गाड्या ढकलत नेन्यात आल्या. अच्छे दिन दाखवाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ढाकला रे ढाकला गाड़ी ढाकला, मोदींच्या नावाने गाड़ी ढाकला अश्या घोषणा देण्यात आल्या. एका बाजूला शेती मालाचे भाव पडलेले असताना पेट्रोल डीज़ल चे दर मात्र दररोज वाढत चालले आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली सेस च्या माध्यमातून प्रती लीटर मागे 7 रुपये लुटले जात आहेत. आणि एकडे मात्र 3 महीने झाले तरी शेतकऱ्यांना उस बिल मिळत नाहीत. सेस चा पैसा कुठे जातो माहित नाही. साखरेचे दर पडलेले असताना पाकिस्तानातून साखर आयात करुन इथाला शेतकरी देशोधाड़ीला लावाला जात आहे. या सर्व प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधन्यासाठी स्वाभिमानीच्या वातिने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे, कमगार नेते अनिल घराळ बापू, तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे,धनंजय महामुळकर, नितीन यादव, लालासाहेब साळुंखे, शंकर चव्हाण, आनंदा शिंदे बापु इत्यादी शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















