निर्भिड पत्रकार
कराड,प्रतिनिधी. सूरज जाधव
मा. मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसा निमित्त मसुर येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर उत्साहात पार पडले.मा. मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मनोज दादा घोरपडे युवा मंच यांच्या मार्फत नेत्र तपासणी, चश्मे वाटप आणि विनामूल्य मोतिबिन्दु ऑपरेशन शिबिर आयोजित केले होते.या वेळी मसुर परिसरातील शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला व मनोज दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.जि.प सदस्य मनोजदादा घोरपडेे मनोगतात बोलताना कराड उत्तर मधील जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आसल्याचे सांगितले. आणि आश्वासन दिले की मोतिबिन्दु ऑपरेशन मोफत पुणे येथे केले जाईल. व असे जनहितार्थ उपक्रम मसूर भागात नेहमीच राबविले जातील असे सांगितले.या वेळी कराड उत्तर महिला आघाडी अध्यक्षा दिपाली ताई खोत, कोरेगाव पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, महिला आघाडी सरचिटणीस शुभांगीताई रसाळ, वाघेश्वरचे तंटामुक्ती आध्यक्ष बाबुराव चौधरी, चंद्रकांत कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिपाली ताई खोत यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे नियोजन केले.



















