निर्भिड प्रतिनिधी
पाटण प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाचे पाटण तालुक्याच्या ठिकाणांचे व बसस्थानकाच्या इमारतीचे व बसस्थानक परिसराचे नूतणीकरन साठी आवश्यक असणारा निधी मंजूर करणेबाबत राज्याचे परिवहनमंत्री ना.दिवाकर रावते याच्या कडे मागणी केलेप्रमाणे त्यानी राज्य परिवहन महामंडळाकडून आवश्यक असणारा सूमारे ७ कोटी रूपयाचा निधीस त्वरीत मान्यता दिली असून या कामाचा भूमिपूजन समारंभ परिवहनमंञी ना.दिवाकर रावते यांचे हस्ते शनिवार दि ३०जून रोजी सकाळी १०वा. पाटण बसस्थानक परिसरात आयोजीत केला असल्याची माहिती या कामाकरीता भरघोस निधीस मान्यता आणणारे पाटण मतदार संघाचे आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली आहे. आमदार शंभूराजेदेसाई यांनी पत्रकात म्हटले आहे कीं पाटण हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्याच्या ठिकाणांचे बसस्थानकाच्या इमारतीची व परिसराची मोठ्या प्रमाणात दूरअवस्ता झाल्याने पाटण बसस्थानकाच्या परिसराचे नूतणीकरण करणेकरता आवश्यक असणारा निधी राज्य परिवहन महामंडळा कडून मंजूर करावा अशी मागणी सन २०१४ ला पाटण मतदारसंघाचा आमदार झाले नंतर राज्याचे परिवहन मंत्री तथा राज्यपरिवहन महामंडळाचे अध्यक्ष ना.दिवाकररावते याच्याकडे केली होती. परिवहनमंत्री दिवाकर रावतेय यांनी सन २०१५-१६ मध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून या कामाकरीता सूमारे ७ कोटी दिली रूपयाचा निधीसतत्वत मान्यता दिली पहिला टप्पात बसस्थानकाचे आधूनिकिकरन करणे दर्जा वाढ करणेच्या कामास मागील वर्षी १कोटी५०लक्ष रूपयाचा निधी ऊपलब्ध करुन देण्यात आला होतां. मात्र बसस्थानकाची दूरावसथा पाहता बसस्थानकाच्या इमारतीचे व परिसराचे नूतणीकरन करणे ही सर्व कामे एकत्र करणे करता आवश्यक असणारा सूमारे ७ कोटी रूपयेच्या निधीस एकाच टप्पात मान्यता देऊन या कामास लवकरात लवकर सूरवात व्हावी. असा आग्रह मंत्री रावते याचेकडे केल्यानंतर त्यानी ७ कोटी च्या निधीस मान्यता दिली यामुळे सर्व कामे एकाच टप्पात करणेत येणार आहेत. पाटण बसस्थानकाचे व परिसराची आधूनिकिकरण या सर्व कामाचा शूभारंभ शनिवार दि ३० जून २०१८ रोजी होणार असून भूमिपूजन झाल्यानंतर तात्काळ या कामाला सूरवात होणार आहे. यामुळे पाटण बसस्थानकाचे रूपडेच बदलून जाणार आहे असा विश्वास आमदार शंभूराजे देसाई यांनीन केला आहे.



















