निर्भिड पत्रकार
फलटण प्रतिनिधी,
फलटण – घाडगेवाडी येथील रहिवासी हनुमंत बासर यांचा मुलगा रणजित बासर हे सीमेवर शत्रुशी लढत आहेत तर ते स्वतः येतील भ्रष्ट शासन व्यवस्थेशी लढा देत आहेत. श्री हनुमंत बासर यांनी गावामध्ये स्वताचे घर बांधण्यासाठी जागा खरेदी केली होती. या जागेची नोंदणी करण्यासाठी त्यांनी रीतसर ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला होता परंतु राजकीय आकसापोटी गावातील काही मंडळी तसेच सरपंच व इतर काही सदस्य यांनी त्या नोंदणीस विरोध करून नोंदणी करून दिली नाही या विरोधात बासर यांनी आवाज उठवला असता त्याच्यावर राजकिय दबाव टाकण्यात आला. शेवटी या त्रासाला कंटाळून बासर यांनी तहसील कार्यालय फलटण येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला व दि. ३ जुलै पासून उपोषण सुरु केले आहे. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्या जवानाच्या कुटुंबावर आज ही उपोषण करण्याची वेळ आली आहे राजकिय आकसापोटी त्यांना विरोध करण्यात येत आहे. या घटने कडे शासन,प्रशासन गाभिर्याने पहिल का? संबधित दोषींवर कारवाही होईल का? याकडे सर्वाचे लागले आहे.



















