चंद्रपूर : ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी- विकास खोब्रागडे दि. २१/०७/२०१८ मौजा पळसगाव ता-चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील दिनाक २१/०७/२०१८ ला दुपारी १.वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर कार्यालय पळसगाव येथील नवीन वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर )कार्यालयाचे उद्धाटन मा-जाधव साहेब ,सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर ,यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले .लोकार्पण सोहळ्याच्या कार्यकमास पळसगाव च्या प्रथम नागरिक मा.गीता शेंडे सरपंच ग्राम पंचायत पळसगाव मा.दुर्गेकर साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी खडसंगी ,मा-लंगडे साहेब वन परिक्षेत्र अधिकारी शिवणी ,मा मुरकुटे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी,पळसगाव मा.लोखंडे साहेब वनपाल पळसगाव, ईको डेवलमेन्ट समिती पळसगाव ,पळसगाव वनपरीक्षेत्रातील वनपाल ,वनरक्षक वनकर्मचारी,वनमजूर व ग्रामस्थ यांच्या उपस्थीती मध्ये लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.



















