सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२४/०८/१८
फलटण, होळ येथील खाजगी सावकारीच्या जाचास कंटाळून उपसरपंच विनोद भोसले यांच्या आत्महत्या प्रकरणी आज कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व युवा नेते रणजितदादा ना.निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .प्रकाश सावंत .व ग्रामीण पोलिस स्टेशन चे नागटीळक साहेब यांच्या बरोबर फलटण शहर पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा केली यावेळी फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री.सावंत साहेब यांनी फलटण जनतेला खाजगी सावकारीच्या विरोधात निर्भिडपणे कोणाच्याही कसल्याही दबावला बळी न पडता संपर्क साधून तक्रारी करण्याचे आव्हान केले व तक्रारदारचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही या वेळी म्हणाले. भोसलेच्या आत्महत्या प्रकरणी उर्वरीत दोन अरोपींना लवकरात लवकर त्वरीत अटक करण्याचे आश्वासन दिले यावेळी तालुका कॉग्रेस अध्यक्ष श्री .तुकाराम शिंदे,भा.ज.पा.तालुका अध्यक्ष श्री .सुशांत निंबाळकर,शेतकरी संघटना जिल्हा युवा अध्यक्ष श्री .धनंजय महामुलकर, श्री. माऊली सावंत, श्री. सिराजभाई शेख, श्री.राजेंद्र निंबाळकर,श्री .काकासाहेब खराडे ,श्री नितीन यादव,श्री.सचिन खानविलकर, श्री.शिवाजीराव जाधव, श्री.अतुल गायकवाड, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















