महाबळेश्वर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,सुमित कांबळे
दि.१.११.१८
दिड वर्षांपूर्वी तथागत नगर,नगरपालिका कर्मचारी क्वार्टर्स च्या बाजुच्या नगरपालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागेवर नगरसेविका श्रद्धा रोकडे यांनी बेकायदेशीर शेड बांधुन नगरपालिकेची जागा अनधिकृत रित्या बळकावली.या विरोधात नागरिकांनी व माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे यांनी मुख्याधिकारी महाबळेश्वर व जिल्हाधिकारी सातारा यांना तक्रार अर्ज दिला होता परंतु सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या दबावामुळे नगरपालिकेकडून सदर अतिक्रमणा विरोधात कारवाई करण्यास नगरपालिका टाळाटाळ करत होती.दि.१२.१०.१८ रोजी छायाताई शिंदे यांनी पुन्हा जिल्हाधिकारी सातारा यांना तक्रार अर्ज देऊन श्रद्धा रोकडे यांचेवर महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ पालिकेच्या सदस्यांच्या पदावधीतील अनर्हता १(ई)नुसार पोटकलम ३च्या तरतुदीच्या अधीन पालिका सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र ठरतात तरी त्यांना नगरसेविका म्हणून त्वरित अपात्र घोषित करावे म्हणून अर्ज दिला.त्याचेवर कारवाई म्हणून नगर पालिकेने श्रद्धा रोकडे यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ हटविले आहे.आता जिल्हाधिकारी पुढे काय कारवाई करतात याची उत्सुकता स्थानिकांना लागून राहिली आहे.तर जिल्हाधिकारी यांचे या कारवाईचे स्वागत असून श्रद्धा रोकडे यांना जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणी तात्काळ नगर सेविका म्हणून अपात्र घोषित करावे अशी मागणी छायाताई शिंदे यांनी केली आहे.एकीकडे गोरगरीब नागरिकांची घरे,दुकाने अतिक्रमणाच्या कारवाईत नगरपालिका उध्वस्त करत असून नगर सेविकेच्या अतिक्रमणास दिलेले अभय यावरून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते आज नगरपालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



















