पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, नितिन फडतरे
दि.०५/११/१८
व्यायामाची आवड असल्याने परिसरातील सर्व सामान्य नागरिक व्यायामासाठी पवनानगर मधे येत आहेत रोज रोज येण्याने भेटी होत गेल्या या भेटीतूनच परिसरतील व्यायामप्रेमी मनात मैत्री निर्माण होऊन एक समूह तयार झाला. या समूहाचे सदस्याची संख्या वाढत गेल्याने सदस्यच्या मीटिंग होऊ लागल्या आपले विचार व्यक्त करू लागले, यातूनच पवना हेल्थ क्लबची निर्मिती झाली, यामध्ये सर्व क्षेत्रातील मंडळी आहेत. सामजिक बाधिंलकी जपत क्लबच्या माध्यमातून अनेक समाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याला सुरवात केली. या मधे गुणवंत विद्यार्थी सन्मान, आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे पाणी फाउंडेशनला श्रमदान, काळेवाडी मधे सायकल रैली काढून इंधन बचत व प्रदूषणमुक्त राहन्याचा संदेश, चिंचवड येथील अनाथ मुलांच्या संस्थामधे दिवळीचे फराळ वाटप, सीमेवर शहीद झालेले जवान शुभम मस्तापुरे यांच्या कुटुंबास मदत ४३०००( त्रैचाळीस हजार ) रुपयेचा धनादेश असे अनेक सामाजिक हिताचे उपक्रमामुळे हा पवना हेल्थ क्लब प्रसिद्ध झाला. त्यातच या दिवाळीला काळेवाडी मधील पवनानगर ज्योतिबा गार्डन मध्ये पवना नदीच्या मध्यभागी साकारलाय प्रती जंजीरा किल्ला…
किल्ला बनविण्यासाठी हेल्थ क्लबच्या सर्वच सदस्यांनी तन, मन, धनाने सहकार्य करून, मेहनत, परीश्रम घेऊन हा उपक्रम राबवित असुन पिंपरी चिंचवड मधील नागरिंकनी या ठिकाणी भेट देण्याचे आव्हान क्लबचे सदस्य श्री संजय पगारे यांनी केले आहे



















