पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विजेंद्र गायकवाड
कोंढणपूर येथे त्रिरत्न बौद्ध महासंघच्या येरवडा येथिल माणुसकी सेंटर दरवर्षी प्रमाणे हिवाळी सर्वसाधारण शिबीर आयोजित केले होते. शिबीराचा कालावधी ५ दिवसीय असुन शिबीर दिनांक ०५ नोव्हेंबर २०१८ ते ०९ नोव्हेंबर २०१८ सातत्याने चालू होते. ह्या सर्व साधारण शिबीरमध्ये वयाच्या ४ वर्षापासून ते ७७ वयापर्यंत उपस्थित होते. प्रत्येक वर्षी ह्या शिबीराची ठराविकच मर्यादित ३०-४० शिबीरार्थी असतात पण वाढती प्रसिद्धी आणि मागणी पाहता ह्यावर्षी माणुसकी सेंटरने शिबीरार्थींची संख्या तब्बल ६० व्यक्तींवर येऊन पोहचली.कोंढणपूर येथिल निसर्गरम्य वातावरण मध्ये हे शिबीर सकाळी ६.३०वाजता चालू होऊन रात्री ९.३०वाजता संपवण्याचे रोजचे सतत ५ दिवस दिनक्रम चालू होते. त्यामध्ये दैनंदिन जीवनातून व्यस्त तणावापासून मुक्त होण्यासाठी आणि शारीरिक मजबूतीसाठी दररोज अर्धा तास व्यायाम आणि ध्यान साधना घेत असत. ध्यानसाधनेमध्ये आनापानसती आणि मैत्रीभावना असे दोन प्रकारचे ध्यान शिकविले जात असत. दररोज पुजावंदना तसेच अनेक वंदनेचाही सराव केला जात असे तसेच जमलेल्या शिबीरार्थी मध्ये ४ गट मध्ये विभागणी करुन गटचर्चाही केली जात असत जेणेकरुन एकमेकांचे विचार व मत समजण्यासाठी मदत होत असे.येरवडा येथिल माणुसकी सेंटरने ह्या शिबीराचे नियोजन केलेले असून प्रमुख नेतृत्व धम्माचारी बोधीधर्म, धम्माचारी विवेकमित्र, धम्माचारी विवेकभद्र आणि धम्माचारीणी वज्रजया ह्यांनी पार पाडले.



















