सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अजय उबाळे
दि.२०/११/१८
पाटण, थंडीची चाहूल लागली असताना राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने अचानक हजेरी लावली तसेच पाटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे.पाटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दर वर्षी दिवाळीच्या सुरवातीला थंडीची चाहूल लागते मात्र यंदा दिवाळीच्या मोसम मध्ये पावसाने सुरवात केली दिवाळी संपल्या नंतर काही भागांमध्ये थंडी सुरू झाली होती तर काही भागांमध्ये उकाड्याला सुरवात झाली होती मात्र रविवार सोमवार मंगळवार पाटण कराडसह पावसानं तडाखा दिला आहे.काही दिवसांपूर्वी पाटण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी बाजार समितीचे सभापती मा. विक्रमबाबा पाटणकर यांनी शेकोटीचे आंदोलन करुन तालुक्यातील अनेक विभागामध्ये दौरे काढले होते.पाटण तालुका ओला दुष्काळ जाहीर होईल का? असा प्रश्न पाटण तालुक्यातील जनतेला पडला आहे.



















