पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास ओव्हाळ
दि.१६/१२/१८
भोसरी,महापालिकेमार्फत भोसरीत रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे महापालिकेस अशक्य असल्याने हे रुग्णालय खासगी संस्थेमार्फत चालविण्याचे प्रयोजन आहे. परंतु या रुग्णालयाचे खासगीकरण करू नये, अशी मागणी विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.साने यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.साने म्हणाले आरोग्य वैद्यकीय सुविधा ही मनपाची मूलभूत सुविधा असून गोरगरीब झोपडपट्टीतील व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये शहरातील नव्हे तर शहराबाहेरून पुणे जिल्ह्यातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये तालेरा,जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भोसरी,आकुर्डी,यमुनानगर,इंदिरा गांधी,खिंवसरा पाटील इत्यादी रुग्णालये सद्यस्थितीत कार्यरत असून ती समाधानकारक वैद्यकीय सुविधा शहरातील नागरिकांना पुरवित आहेत.व ही रुग्णालये मनपामार्फत चालविली जात आहेत.तर दुसरीकडे वायसीएममधील रुबी केअर हे मनपाचे रुग्णालय खासगी संस्थेस चालविण्यास दिले आहे. परंतु या रुग्णालयाबाबत रुग्ण व नागरिकांशी उद्धट वर्तन राज्य शासनाच्या वैद्यकीय योजना व्यवस्थित न राबविणे रूग्णांकडे लक्ष न देणे लोकप्रतिनिधींचे फोन न घेणे त्यांच्याशी उद्धट वर्तन करणे स्वरूपाच्या गंभीर तक्रारी या रुग्णालयाबाबत येत आहेत.अपुऱ्या कुशल मनुष्यबळामूळे रुग्णालय खासगी तत्वावर देण्याचे नियोजन आहे.वायसीएम मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विविध संवर्गातील पदे व त्या अनुषंगागिक वेतनश्रेणीस शासनाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेमधून आपणास कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही का ? रुबी केअर या रुग्णालयाचा खासगी तत्वावर देण्याचा अनुभव क्लेशदायक आहे.तरीसुद्धा भोसरीचे प्रस्तावित रुग्णालय खासगी तत्वावर देण्याचा अट्टाहास का केला जात आहे. भाजपाचे पदाधिकारी त्यांच्या अंतर्गत कुरघोड्या सुरू असून फक्त टक्केवारीच्या राजकारणात गुंतले असून त्यांचे शहराच्या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.



















