चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.८/२/१९
चिमूर, माता रमाई यांच्या १२१ व्या जयंती निमित्त महामाया महिला मंडळ व अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगावच्या वतीने माता रमाई यांची १२१वि जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत. रमाईने दिलेल्या त्यागाला तोड नाही. त्यामुळे रमाई यांच्या त्यागाची आठवण ठेवून त्यातून प्रेरणा घेतल्यास सामाजाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. महामाया महीला मंडळ व अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगाव च्या वतीने नालंदा बुध्द विहारच्या पटांगणात माता रमाई चा कार्यक्रम निमित्त दि.६ फेब्रुवारीला रात्री९ वाजता महिला, मुली, मुले, तरुण मुले यांच्या संगीत खुर्ची स्पर्धा चमचा गोळी स्पर्धा घेण्यात आल्या दोन दिवसायी कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात आले.रात्रोला पंचशील भजन मंडळ पळसगाव यांचा समाजजागृती पर बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम करण्यात आला, दि.७ ला सायंकाळी ४वा. माता रमाई भीमराव आंबेडकर आईची भव्यदिव्य धम्म रॅली उपासक उपासिका यांच्या उपस्थिती मध्ये धम्म मिरवणुक काढण्यात आली. मा.दामोदरजी रामटेके अध्यक्ष अ,भा,बौद्ध,महासभा, प्रभाकर गजभिये सचिव अ, भा, बौद्धसमाज, सुनीता पाटील,महामाया महिला मंडळ च्या सचिव, अध्यक्षा वनिता भीमटे यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे झेंडा वंदन करण्यात आले. या कार्यक्रमास,वर्षा लोणारकर माजी पंचायत समिती सदस्य, रागिना दडमल पोलीस पाटील,लोखंडे साहेब वनपाल, सौ लोखंडे मॅडम, वासनिक सर, यांच्या हस्ते महाकारूनिक शांतीदूत तथागत भगवान बुद्ध व माता रमाई, तुमचे आमचे बहुजनांचे उद्धारक बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीआई फुले, महात्मा जोतिबा फुले, यांच्या प्रतिमाना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमास धम्म उपासक उपसीका व गावातील नागरीक उपस्थित होते. सायंकाळी स्नेहभोजन चा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमास उपासक, उपसिका, यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती.



















