चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
चिमुर, पं.स.चिमूर अंतर्गत जि.प.उच्च.प्राथ.शाळा, विहिरगांव येथे सलाम बाँबे मुंबई उपक्रमा अंतर्गत तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भास्करजी कोसरे शाळा व्यवस्थापन समिती, मा.उत्तमजी श्रीरामे उपाध्यक्ष, सौ.कुंदाताई शेंडे सदस्या, श्री.प्रदीप गौरकार मु.अ.डॉ. सौ.लताताई मेश्राम सहा.शिक्षिका, श्री.देविदास वेटे सहा.शिक्षक, श्री.नंदू सोयाम सहा.शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करून शासनाचे ११ निकष पुर्ण केल्यामुळे तंबाखू मुक्त शाळा घोषित करून श्री.प्रदीप गौरकार मुख्याध्यापक यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळा तंबाखू मुक्त होण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा.गोपालजी मैंद आरोग्य सेवक, कु.बोरकुटे मॅडम आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु.यांनी १३२ विद्यार्थिची मुख तपासणी करून मार्गदर्शन केले व शालेय विद्यार्थ्यांना आरोग्या विषयी माहिती दिली. गांव तंबाखू मुक्त व तंबाखूजन्य पदार्था पासून मुक्त होण्यासाठी गावातून घोषवाक्य देऊन जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.



















