पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
७/३/२०१९
खडकी:- भारिप बहुजन महासंघ तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार दि.३ रोजी खडकी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच सभासद नोंदणीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी भरघोस असा आवर्जून प्रतिसाद दिला. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे सदस्य निर्भिड पत्रकारचे प्रतिनिधी अमर सुर्यवंशी,अतुल गंभीरे,तसेच सामाजिक कार्यकर्ते सुशील रणधीर,युवराज गायकवाड,राष्ट्रपाल मेश्राम पुणे क्राईम ब्रांचचे दिनेश गडअंकुश आदी मान्यवरांकडून रक्तदान करण्यात आले. या वेळी भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















