पिंपरी चिंचवड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,अमर सुर्यवंशी
दि.०२/०५/१९
पिंपरी, बोपोडी परिसरात डासांचा अतिरेक प्रचंड वाढला असुन या मुळे येथील राहिवाशी डेंगू ,मलेरिया या रोगाची शिकार होत आहेत या कडे महानगरपालिका व स्थानिक नगरसेवकांचे असलेले जाणिवपुर्वक दुर्लक्ष या निषेधार्थ भिम आर्मी संघटनेच्या वतीने बोपोडी भागात अभिनव उपक्रम घेऊन बोपोडी भागातील नागरीकांना मच्छर अगरबत्तीचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी भिम आर्मी संघटनेचे बोपोडी चे अध्यक्ष गौतम कोटे राकेश कांबळे उमेश शेळके पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















