चंद्रपूर(निर्भीड न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१०.०५.१९
चिमूर, तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या उसेगांव येथे स्वामीक्रुपा बहुउद्देशीय संस्था, नागपुर,फँशन डीझायनींग स्कील डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रन बॉय एस.बी.एस.र.न.एम.एच.८६३/ १५ यांच्याकडुन महीलांकरीता एक महीन्याचा प्रशिक्षण घेण्यात आले होते .या प्रशीक्षणामध्ये २५ महीलांचा समावेश होता.या महीलांनी अनेक प्रकारचे ड्रेस डीझायनींगचे एक महीन्यात धडे घेतले.१० मे ला या संस्थेचे फील्ड ऑफीसर राउत,वीठ्ठल नेवारे,तसेच प्रशीक्षण प्रमुख ज्योत्सना गाडगे यांनी प्रशिक्षणार्थ्याना लाई मशीनचे प्रमाणपत्र वाटप करून तसेच दोन दिवसांनी पेपर घेवून शिलाई मशीन प्रशीक्षणार्थ्याना मशीन देणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे .



















