पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०५.१९
पिंपरी चिंचवड- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांचा वाढदिवस खूपच उत्साहात साजरा करण्यात आला. युवा उद्योजक ग्रुप,पुणे.जयभिम ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने गोरगरीब मुलांना अन्नदान तसेच खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.युवकांनी केक कापून अनेक उपक्रम राबविण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे आयोजक सुशिल रणधीर,निर्भिड पत्रकार मोशी प्रतिनिधी अमर सूर्यवंशी, निर्भिड पत्रकार बोपोडी प्रतिनिधी अतुल गंभीरे, अनिल पठारे,मुकेश रजपूत,राष्ट्रपाल मेश्राम,युवराज गायकवाड, विकास ओव्हाळ यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.



















