पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
पिंपरी – पिं.चि. महानगरपालिकेच्या वतीने यशवंत नगर येथील रहिवासी साठी (गोरगरिबांसाठी) एस आर ए योजने अंतर्गत पक्क्या इमारती बांधन्याचे काम मासुळकर कॉलनी येथील उद्यम नगर या ठिकाणी चालू आहे.
सदर कामास येथील स्थानिक माजी नगरसेवक श्री.अर्जुन ठाकरे यांनी विरोध दर्शविला असून त्यांच्या विशेष अर्थ मंगळवारी दिनांक १४.०५.१९ रोजी महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चाच्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यम टीव्ही 9 मराठी या वाहिनीशी बोलताना येथील आमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या ठिकाणी असली लोक असली तर आमची शांतता भंग होईल शकेल. असे व्यक्तव्य करून एक प्रकार मागासवर्गीय यांच्या बद्दल असलेला द्वेष यांनी व्यक्त केला. व आमच्या सरकार मान्य योजनेस अडथळा आणून जातिवाद केला आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेतील अधिकारी श्री.राजन पाटील यांनी श्री अर्जुन ठाकरे यांच्या सुरात सूर घालून योजना बंद करून जातीयवादाला खत-पाणी घातले आहे. व सरकारी धोरणाची खिल्ली उडवली आहे.
यामुळे तमाम महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखवल्या आहेत.
त्यामुळे सदर दोन्ही व्यक्तीवर जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे संस्थापक/अध्यक्ष-संतोष निसर्गध यांनी निवेदनाद्वारे केली आहे. असे निवेदन श्रीधर काळे, शिवशंकर उबाळे.अशोक डोंगरे यांनी पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.



















