चंद्रपुर(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०५.१९
बल्लारपुर- बामणी दुधोली ता बल्लारपूर जि चंद्रपूर येथे (दि.३०गुरुवार) एक अनोळखी इसम ग्राम पंचायत बामणीचे सांस्कृतिक भवन जवळ मृत अवस्थेत आढळून आला सविस्तर वृत्त असे की गुरुवारला ग्राम पंचायत बामणी येथील ग्राम पंचायत ची मासिक सभा सुरू होती अंदाजे ३ वाजता मासिक सभा संपल्यानंतर ग्राम पंचायत चे संगणक परिचालक संजय दरवडे हे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची मोटारसायकल ही सांस्कृतिक भवनच्या गेट कडे होती,ते गाडी कडे गेले असता एक अनोळखी माणूस भर उन्हात झोपलेला दिसला लागेच त्याच्याकडे जाऊन बघितले असता त्याच्या शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल आढळून आली नाही आणि दरवडे यांनी ताबडतोब ग्राम पंचायत चे सरपंच सुभाष ताजने यांना या घटनेबद्दल माहिती दिली व उपसरपंच जमील शेख याना सुद्धा माहिती दिली तेंव्हा घटनास्थळ वरती जाऊन बघितले असता तो अज्ञात इसम मद्यप्राशन करून निपचित पडला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू पावला असावा.असा मृत अवस्थेत आढळून आला लगेच सरपंचानी पोलीस स्टेशन बल्लारपूर इथे कळविले असता पोलीस घटनास्थळी आलेत त्यांनी चौकशी चालू केली असता मृतकाच्या पुरूषयांचे अंगावरील कपडे पाहिले असता त्याच्या खिशामध्ये ग्राम पंचायत जैरामपूर चे पाणी कराची पावती आढळली त्या पावती वरून त्याची पूर्णपणे ओळख पटली असुन त्याचे संपूर्ण नाव श्री.दिलीप लटारी भोयर रा. जैरामपूर जिल्हा गडचिरोली असे असून समोरील चौकशी चालू आहे.मात्र पोलिसांकडून दारू पकडण्यात येते असे असताना जिल्ह्यातील दारूचे पाट वाहत आहेत.
पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील गावात दारूचे पाट वाहत आहेत. पोलिस कारवाई करतात असेही सांगितले जाते. मग जिल्ह्यात दारूचा हा महापूर कसा? असा सवाल गावातील बंदी असताना दारूचा कुटीर व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शिवाय अति सेवनामुळे दारूच्या सेवनाने मृत्यू झाल्याची चर्चा आता जिल्ह्यात नित्याचीच झाली आहे. या प्रकाराकडे पोलिस विभागाने लक्ष देने गरजेचे आहे.
गावठी दारूवर आळा घालण्याकरिता जिल्हा पोलिस विभागाच्यावतीने ‘वॉश आउट’ मोहीम राबविण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत याचा त्रास वाढला असून नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.



















