चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.०२.०७.१९
चिमूर- चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या नेतृत्वात चिमूर मतदार संघातील कार्यकर्त्यांसाठी अभिनंदन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन मान.खा.अशोकजी नेते यांना भरगोस मतांनी लोकसभेत पाठविल्या बद्दल चिमूर मतदार संघातील कार्यकर्त्याचे अभिनंदन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार बंटीभाऊ भांगडिया साहेब व जिल्हा अध्यक्ष हरीश भैया शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले.
चिमूर मतदार संघात अनेक विकास काम करून चिमूर तथा नागभीड शहराचा चेहरा मोहरा बदलणार,विकास काम करूनच आपल्या सर्वांचे ऋण फेडणार असल्याचे असल्याचे याप्रसंगी आमदार बंटीभाऊ बोलत होते तसेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच चिमूर मतदार संघात अनेक विकास काम करणे श्यक्य झाले असेही याप्रसंगी बोलत होते.
यावेळी जिल्हा अध्यक्ष हरीश भैया शर्मा,जिल्हा उपाध्यक्ष श्याम जी हटवादे,जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूरकर,जेष्ठ नेते खलोरे सर, बंडूभाऊ नाकाडे,नीलम मामा राचलवार,डॉ दिलीप शिवरकर,प्रकाश मामा वाकडे,संजयभाऊ गजपुरे,बकाराम जी मालोदे,दिलीप जी कारेकर,प्रकाश जी बोकारे,सुधीर जी दंदे, समीर जी केने,परशराम जी ननावरे, राजूभाऊ देवतळे,विनोदभाऊ अध्याल,विकासभाऊ मेहरकुरे,एकनाथ जी थुटे, गीताताई लिंगायत,रेखाताई कारेकर,पायलताई कापसे, शिल्पाताई राचालवार,नर्मदाताई रामटेके, पुंडलिक जी मत्ते,अविनाश भाऊ फरकाडे,छायाताई करचरलावार,भारतीताई गोडे,उषाताई हिवरकर,तुषार काळे,शरद जी गिरडे,जयंतभाऊ गौरकार,अजहर जी शेख,टिपले सर,किशोर मुंगले आदींसह भाजप आघाडी अध्यक्ष, भाजप पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















