पिंपरी (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०१.०७.१९
भोसरी- इंद्रायणीनगर,भोसरी मधील विद्युत पुरवठा अखंडित झाल्याने विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करण्याबाबतचे निवेदन महावितरणचे मा. कार्यकारी अभियंता श्री. गवारे यांना निवेदन देऊन फिडर नं. १७ व ४ मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने तात्काळ दुरुस्ती करून घेणे, जुन्या केबल बदलणे, जॉइंटर वेळेवर उपलब्ध करुन देणे इ. विषयी चर्चा करण्यात आली व मा. कार्यकारी अभियंता यांना समवेत घेऊन वीज बंद असलेल्या भागात पाहणी केली. मा. गवारे साहेबांनी सर्व कामे मार्गी लावण्याचे आदेश संबधित अभियंत्यास बैठकीत दिले.कामे मार्गी न लागल्यास नगरसेवक वाबळे जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.



















