◆ तंबाखुमुक्त शाळा करण्यास
शासन अपयशी – डॉ. कुणाल
देशमुख
पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.०१.०७.१९
चिंचवड- युवासेना पिंपरी चिंचवड व डॉ.कुणाल देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात तंबाखुमुक्त शाळा अभियान सुरु करण्यात आले. याची सुरवात चिंचवडमधील केशवनगर शाळेमधून करण्यात आली त्यावेळी डॉ. कुणाल देशमुख बोलले होते. सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये व लहान मुलांमध्ये गुटखा, तंबाखु, सिगारेट, बिडी व तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे व्यसन असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्या विरोधात जनजागृती करणे गरजेचे असल्याने युवासेनेच्या व डॉ. कुणाल देशमुख यांच्या माध्यमातून तंबाखुमुक्त शाळा व परिसर असे अभियान व स्तुत्य उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका उर्मिला काळभोर व नगरसेवक सुरेश भोईर, मुख्याध्यापक आर. डी.कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुणाल देशमुख यांनी तंबाखु आरोग्यासाठी कशी हानिकारक आहे, कोणकोणते विकार, दुष्परिणाम व्यसनामुळे होतात, कुटुंबाला कशाप्रकारे त्रास होतो याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. देशाचे उद्याचे भवितव्य ज्याच्या हातामध्ये आहे त्याच शाळामधील ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन असल्याने त्याबात डॉ. देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. शाळेच्या ५०० मीटर परिसरामध्ये गुटखा, तंबाखु, सिगारेट, बिडी व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. यावर बंदी घालण्याबाबत तंबाखुमुक्त शाळा अभियान राबविण्यास शासन सपशेल अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले. याबात बोलताना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी युवासेनेच्या माध्यमातून तंबाखुमुक्त शाळा अभियान हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे व या उपक्रमाची खरोखर गरज असल्याने याबाबत संपूर्ण शिवसेना, डॉ. कुणाल देशमुखव व युवासेना यांच्या पाठीशी ठाम उभी राहील असे मत व्यक्त केले.हा उपक्रम १ वर्ष महापालिकांच्या शाळांमध्ये चालणार असून या कार्यक्रमांचे आयोजन युवासेना पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, पिंपरी विधानसभा अधिकारी अभिजित गोफण, युवती अधिकारी शर्वरी जळमकर, राहुल पालांडे व विनायक खामगळ यांनी केले. या कार्यक्रमात मुख्याध्यापक आर. डी.कुंभार, वंदना खंडागळे, सावली शिंदे, क्रांती शिंदे, भोलाराम पाटील व रविराज मांडवे, डॉ. रितिका देसाई, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ, राहुल मणिहार, उपस्थित होते.



















