सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,संतोष पवार
दि१२.०७.१९
पंढरपुर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडनवीस व त्यांच्या पत्नी सौ.अमृता फडनवीस यांच्या हस्ते शासकीय पुजा पार पडली.यावेळेस मानाचे वारकरी म्हणून सांगवी ता.अहमदपुर जि.लातुर येथील विठ्ठल चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना संधी मिळाली.आषाढी एकादशीनिमित्त शेकडो किलोमीटर वरून पायी चालत आलेल्या मानाच्या दिंड्यासह अनेक दिंड्या पंढरपुरात काल दाखल झाल्या.अंदाजे या सोहळ्या साठी दहा ते बारा लाख वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत.नदी परीसरातील ६५ एकर जागेवर दिंड्या मुक्कामी आहेत.तसेच या वर्षी पंढरपुरात पाऊस झाल्यामुळे चंद्रभागेला पाणी भरपुर आहे.त्यामुळे वारकरी आनंदात आहेत.



















