बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.१२.०७.१९
आष्टी- आषाढी कार्तिकी एकदशी निमीत खिळद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिळद फराळ व केळी वाटप करण्यात आले आहे.खिळद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिळद येथिल केंद्र अंतर्गत जवळपास १२ ते १३ केंद्राच्या अंतर्गत शाळा येत आहेत.अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते. व सुसज्ज कॉम्प्युटर ई-लर्निंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते.तसेच अंतर्गत गुण कौशल्यानुसार ही प्रोत्साहन दिले जाते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतर्गत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते.फराळ वाटप करताना यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गर्जे ,सरपंच डॉक्टर श्रीराम गर्जे, उपसरपंच भाऊसाहेब गर्जे, श्रीकांत गीते, मुख्याध्यापक शेकडे सर, शिंदे सर, झगडे सर, महाजन मॅडम, शेख मॅडम व आदी शिक्षक उपस्थित होते.



















