सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.२३.०७.१९
कोयना- धरणग्रस्तांचे व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी तीवरे धरण फुटी प्रकऱणातील खेकड्यांची नामीयुक्ती पाटण तालुक्यातील धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबतची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुजोर व बेशिस्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या स्टाईलने वठणीवर आणनारे पाटण कृषिबाजार समितीचे विद्यमान सभापती मा.विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण तालुक्यातील धरणग्रस्त आणी प्रकल्पग्रस्त लोकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत संबंधीत शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या खेकडावृत्तीच्या प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी दि.२२जुलै रोजी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त लोकांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवणाऱ्या सरकारचे प्रतिकात्मक रूप म्हणजे खेकडा असल्यामुळेच मा.विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना खेकडा वाटप करून आपल्या स्टाईलने हे खेकडा आंदोलन केले. यावेळी आर.पी.आय चे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा.रविंद्र सोनावले, वामन साळुंखे, किसन शिंदे, महीपती पवार, संजयb शिंदे, रविंद्र देवकांत, बाबासो सावंत, दादा कदम, तुकाराम भोसले, भरत शिंदे, राजेंद्र सावंत आदी धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.



















