सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.२३.०७.१९
करमाळा- उद्या दि.२४ जुलै रोजी भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने करमाळा बंदचे अवाहन करण्यात आले आहे. सदर आंदोलन हे अदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्यातील कामगारांचा तीन वर्षाचा पगार दिला नाही.म्हणुन आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन दशरथ (आण्णा )कांबळे ,वंचित बहुजन आघाडी सोलापुर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेत्रुत्वाखाली होणार आहे.ठिक ११:०० वा आंदोलनाची सुरवात महात्मा गांधी पुतळा जामखेड रोड पासुन होणार आहे.तरी करमाळा तालुक्यातील व करमाळा शहरातील व्यापाऱ्यांने दुकाने बंद ठेऊन व्यापारी संघटने सहकार्य करावे व सामील व्हावे अशी संघटनेला विनंती करण्यात आली आहे.सदर आंदोलनाचा शेवट करमाळा तहसील समोर होईल अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष सुभाष ओहाळ यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधिंशी बोलताना दिली.



















