पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२३.०७.१९
◆ बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवर मोर्चा काढून पालिका आयुक्त, कामगार विभाग,आणि पोलीस आयुक्तांना निवेदन.
पिंपरी- कष्टकरी कामगार पंचायत वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे मोर्चाचे नेतुत्व करणार आहेत. बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ चे कलम १२ (२) व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियम व सेवाशर्ती) नियम २००७ मधील नियम ४६ प्रमाणे बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याचे अधिकार महानगर पालिका वार्ड अधिकारी यांना देण्यात आले आहेत, परंतु प्रत्येक्ष मात्र महानगरपालिकेत नोंदणी आणि रिणीवल आदी कोणतेच काम केली जात नाही या बाबतची माहिती नाही असे म्हणून अधिकारी अंग झटकत आहेत.या मुळे बांधकाम मंजूर शासनाच्या योजने पासुन वंचित राहत असुन त्यांची नोंदणी नसल्या मुळे कोणतेही लाभ दिले जात नाही.
ज्याची नोंदणी झाली अशा बांधकाम मजुरांना रिणीवल करण्याच्या नावा खाली वेगवेगळे कागदपत्र मागुन त्यांची अडवणुक केली जात आहे. कामगार कार्यालय आणि बांधकाम मंडळाच्या या लहरी कारभार मुळे गोरगरीब कष्टकऱ्यांचे जीव धोक्यात जात असुन अनेकांना आपला प्राण गमवावे लागत आहे. अनेक ठिकाणी अपघातत बांधकाम मजुरांचे प्राण गमवावे लागले आहेत.पुणे येथे दोन घटनांत २५ बांधकाम मजुरांचा मुत्यु झाला असुन,पिंपरी चिंचवड येथे शासनाचा प्रकल्प असलेल्या म्हाडाच्या साईटवर अपघात एका मजुरांचा मुत्यु झाला असुन दोन मजुर गंभीर जखमी आहेत या मुख्य मालकांवर (बिल्डर )गुन्हा दाखल करण्या ऐवजी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून मुख्य मालक आणि म्हाडा अधिकारी यांना वाचवलं जात आहे कामगार विभागाने तर कोणतीच कारवाही केली नाही. अन्य एक साईटवर १८/०७/२०१९ रोजी अपघात होऊन देखील गुन्हा दाखल नाही प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा प्रकारे बांधकाम मजुरांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे या सर्व प्रश्ना साठी पिंपरी येथे मोर्चा काडून निवेदन देण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या
◆ पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांची महानगरपालिकेच्या वार्ड ऑफिस मध्ये नोंदणी आणि रिणीवल चे कामकाज सुरु करावे
◆ म्हाडा आणि इतर साईटवर झालेल्या अपघात मुख्य मालक(बिल्डर) आणि म्हाडा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे मुत्युच्या नातेवाईकांना नुसकान भरपाई मिळावी.
◆ नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात यावेत.
◆ मंडळाच्या वतीने 4 लाख कामगाराना घनबुट, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जाळी सह सुरक्षा साधने देण्यात आली (परंतु प्रत्येक्ष मात्र एकाही बांधकाम मजुराकडे सुरक्षा साधन नाहीत हे ज्याज्या ठिकाणी अपघात झाले त्या ठिकाणी कामगारांच्या अंगावर वरील साधन नव्हतेच हे सिद्ध झाले आहे ) मग वाटप केलेल्या सुरक्षा साधन गेले कुठे यांची चैकशी करावी.
◆ पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र बांधकाम कल्यानं मंडळ चे कार्यालय सुरु करावे बांधकाम मजुरांची नोंदणी आणि लाभ देण्याची ऑनलाईन पद्धत सुरु करावी.
◆ पिंपरी चिंचवड शहरातील धोकेदायक बांधकामाची यादी करून अपघात होण्यापूर्वीच आशा कामावर बंदी घालुन स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये संबधित बिल्डर विरोधात कादेशीर कारवाई करावी.
◆ नोंदणी नसताना बांधकाम साईटवर अपघात झाल्यास त्यांच्या वारसदारास अपघाती मुत्यु प्रमाणे लाभ देण्यात यावेत.
◆ पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगाराच्या नाक्यावर निवारा शेड पाणी,टॉयलेट सह इतर विविध उपयोजना करव्यात
या सह इतर विविध मागण्यासाठी दि २४जुलै१९ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.



















