बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल मोरे
दि.२५.०७.१९
आष्टी- तालूक्यातील रूई नालकोलचे भूषण,भूमिपुत्र श्री.बजरंग बनसोडे यांची नुकतीच पदोन्नती होऊन ते पोलीस अधीक्षक तथा पोलीस उप आयुक्त हे पद प्रदान झाले आहे. त्याप्रसंगी गावंकऱ्यांसह जि.प.कें.प्रा.शाळेच्या वतीने शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.या वेळी मुख्यध्यापक, अध्यक्ष श्री.गांजुरे डी.बी. व शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष,श्री. आजिनाथ कन्हेरकर, उपाध्यक्ष श्री.परसराम नालकोल, श्री.संतोष पुंड व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.



















