पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२५.०७.१९
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत घरांचा सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा, या मागणीसाठी शास्तीविरोधी कृती समिती आज गुरुवार (दि.२५) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक,अध्यक्ष- युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली पिंंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व हितचिंतक सहभागी झाले होते.शास्तीकर व अनाधिकृत बांधकाम नियमित करण्या बाबत आजच्या मोर्चात आवाज उठविला आहे.तसेच वेळोवेळी शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने नागरीकांचे ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सक्रीय सहभाग घेऊन आवाज उठविण्यात आला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मारूती भापकर, शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष- युवराज दाखले, चेंबुर विधानसभा महिला अघाडी अध्यक्षा प्रार्थनाताई कानडे मिटना, राहुल शिंपी, दिपक कांबळे, रविकिरण घटकार, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गिरी, शिवसेना विभाग संघटीका भाग्यश्रीताई म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्षा सुनिताताई खंडाळकर, पिंपरी चिंचवड शहरअध्यक्ष विशाल बाविस्कर, प्रदेश सचिव आशिष वाळके, आदी शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.



















